मंचर उपजिल्हा रुग्णालयात होते रुग्णांची गैरसोय ( हेळसांड )

Bharari News
0
आंबेगाव प्रमिला टेमगिरे
           घोडेगाव (तालुका आंबेगाव) ग्रामीण रुग्णालय असेल किंवा उपजिल्हारुग्णालय मंचर असेल. सामान्य रुग्णांना अतिशय हीन प्रकारची वागणूक देतात... 
  अक्षरशः रुग्णाच्या भावनांशी खेळतात.. हे कुठं तरी थांबलं पाहिजे.. जोपर्यंत पुढाऱ्यांच्या हस्तक्षेप थांबत नाही. तसेच संबंधित डॉ. यांना त्यांच्या कर्तव्यांची जाणीव होत नाही,. सामान्य जनतेला तसेच रुग्णांना त्यांच्या हक्काची जाणीव होत नाही तोपर्यंत हे असेच चालणार.. सगळ्यांनी वेळोवेळी लढा देऊन यांना वठणीवर आणले पाहिजे.. जिथे रुग्ण असतात तिथे.. पुढाऱ्यांचे वाढदिवस त्यांच्या मोठ्यापणासाठी घालून देऊ नका.2 केळी देणार. आणि मोठेपणा गावभर मिरवणार..15 दिवसांपूर्वी घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात शौचालय तुंबले होते. त्यातही ऍडमिट रुग्णांना त्यांचे नातेवाईक असतील त्यांना जेवण करणेही किळसवाणे वाटत होते.. झोप येणं तर दूरच.मला एका पेशंट चा कॉल आला.. लगेच तिथे जाऊन झालेल्या प्रकारची माहिती मी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नांदापुरकर . वैद्यकीय अधिकारी डॉ. वणवे .. डॉ.. देवमाणे यांनाही दिली.असे प्रकार जर परत घडले तर वेळेत निदर्शनास आना कोणत्याही व्यक्तीला किंवा पुढार्यांना घाबरण्याचे कारण नाही नाही ऐकले तर संबंधित प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन उभं करा.पण हे सगळं थांबवा असे सामाजिक कार्यकर्ते विजय कोरडे व घोडेगाव तसेच मंचर व तालुका आंबेगाव वासिय ग्रामस्थ यांनी प्रसारमाध्यम भरारीशी बोलताना सांगितले, 
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!