आंबेगाव प्रमिला टेमगिरे
मंचर (ता आंबेगाव) रयत शिक्षण संस्थेचे, महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय, मंचर येथे इनरव्हील क्लब ऑफ मंचर यांचे मार्फत इयत्ता पहिली ते आठवीच्याचौथीच्या विद्यार्थ्यांना तिरंगा वाटप करण्यात आले.
भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे उद्बोधन करण्यात आले. त्याचप्रमाणे, दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या घरावर तिरंगा फडकवण्यासाठीचे नियम व योग्य ती खबरदारी घ्यावी याविषयी माहिती देण्यात आली. इनरव्हील क्लब ऑफ मंचरच्या अध्यक्षा ममता समदडीया, सेक्रेटरी रागिनी बोऱ्हाडे, रश्मी समदडिया, पटेल, सोनल भंडारी, पुंगलिया या सदस्याही वरील कार्यक्रमास उपस्थित होत्या.या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य मा.ज्योतीताई निघोट, शिल्पा बनबेरू,डॉ. मनाली बाणखेले, केंगले रूपाली इ. ,शालेय स्कूल कमिटीचे सदस्य मा. संतोषजी बाणखेले व मा. आशिष पुंगलिया हेही उपस्थित होते. विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका एरंडे मॅडम यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंगले सर यांनी केले.