गावडेवाडी प्रतिनिधी मिलिंद टेमकर
रयत शिक्षण संस्थेच्या श्री भैरवनाथ विद्यालय अवसरी खुर्द या शाखेमध्ये अटल बिहारी वाजपेयी विचार मंच यांच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव
साजरा करण्यात आला,
आंबेगाव तालुक्याच्या तहसीलदार .रमाताई जोशी यांच्या शुभहस्ते भारतीय सरकारच्या संरक्षण दलात अतुलनीय योगदान दिलेल्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मा.डॉ.ताराचंद कराळे, प्राचार्य मा.डी डी जाधव सर,स्कूल कमिटी सदस्य प्रशांत अभंग, शरदराव शिंदे,आरोग्य दूत मा.सुशांत बाबत थोरात, आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष मा.मेघशाम उर्फ बंटीशेठ भोर पाटील,भाजपा आयटीसेलचे अध्यक्ष प्रसाद खोल्लम,भाजपा अवसरी खुर्द शहराध्यक्ष स्वप्निल इंदोरे,भाजपा नेते उत्तम शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सचिनराव ढोणे,पोलीस पाटील संतोष शिंदे, प्रशांत पठारे आदी मान्यवर उपस्थित होते.