सासवड :प्रतिनिधी :बापू मुळीक
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नावाजलेल्या श्री भुलेश्वर ची यात्रा संपूर्ण श्रावण महिन्यात सुरु असते.या यात्रेच्या काळात पुणे जिल्ह्या सह महाराष्ट्रातील विविध ठिकाणावरून भाविक देवदर्शनासाठी येत असतात.
श्रीनाथ म्हस्कोबा कवडीची प्रस्थान पिसे येथून ११ वाजता होऊन कावड १२ वाजता भुलेश्वर पायथा येथे पोचल्यानंतर आरती होऊन कावड अवघड स्थितीतून भक्त गणांनी पिसे-रिसे-खोपडेवाडी येथील युवकांनी कवडीला कोणताही डाग फटका न होता कावड सुरळीत वरती पोहचली ,याठिकाणी देवाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून पिसे -माळशिरस -राजुरी-यवत-राहू-राजेवाडी या ठिकाणावरून आलेल्या कावडींनी महादेवाच्या मंदिराला पाण्याची धार घालण्यात आली.या निवडीसाठी सरपंच रोहन मुळीक,उद्योगपती संतोष मुळीक,पत्रकार बापू मुळीक,प्रकाश ज मुळीक,माजी सरपंच दीपक मुळीक,माजी उपसरपंच संदीप मुळीक,रमेश मुळीक,अध्यक्ष काँग्रेस कमिटी दौंड विठ्ठल दोरगे,गजानन मुळीक,बाळू गोसावी,जालिंदर आ मुळीक,गुलाब भैय्या सय्यद,विजय इंगळे,पिसे -रिसे-खोपडेवाडी येथील युवा नेतृत्वाने बहुसंख्येने कावडीसाठी विविध उपाययोजना केल्या होत्या असे उद्योगपती संतोष मुळीक यांनी प्रतिनिधीला माहिती दिली.