सासवड :प्रतिनिधी :बापू मुळीक
रिसे(ता.पुरंदर)येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींची श्रावणी सहल खोपडेवाडी येथील काळूबाई मंदिरात श्रमदानातून करण्यात आली.
काळूबाई मंदिर परिसर स्वच्छता उजळ माळरानावर टेकडी फोडून केले वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्यात आले.औषधी वनस्पतींची माहिती क्षेत्र भेटीतून निसर्गाचा अभ्यास ,क्षेत्रभेटीतून विविध उपक्रम राबविण्यात आल्याचे ज्येष्ठ शिक्षक विठ्ठल कदम यांनी सांगितले. सहलीचे नियोजन गायकवाड एम.ए. यांनी केले.सहलीमध्ये मंगल पिसाळ यांनी मुलांना खाऊ वाटप केले.यासहलींमध्ये मुख्याद्यापक विजय काकडे शिक्षक वाईकर ,भागवत,झेंडे,नातू ,जाधव,नितीन माने,विद्यार्थी ,विद्यार्थिनी आदी उपस्थित होते.याची सविस्तर माहिती मुख्याद्यापक विजय काकडे यांनी प्रतिनिधीला माहिती दिली.