शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
मुखई (ता.शिरुर) येथील एका ३६ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्यात याबाबत चंद्रकांत आंनदा माळी (वय ४६ वर्षे, रा. मुखई, इंदिरानगर, ता शिरूर, जि पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
शिक्रापूर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार राजेश अंकुश माळी (वय ३६ वर्षे, रा. मुखई, इंदिरानगर, ता शिरूर, जि पुणे ) याने राहत्या घरी घराचे छताचे आड्यास नायलाँन च्या दोरीने गळफास घेतला असून त्यात राजेश अंकुश माळी हे मयत झाले आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकले नाहीत. शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार चौधर पुढील तपास करत आहेत.