सासवड :प्रतिनिधी: बापू मुळीक
रिसे (ता.पुरंदर )येथे रिसे पिसे हायस्कुल मध्ये ग्राउंड सपाटीकरण साठी ग्रामस्थांमार्फत माजी सरपंच ,विद्यमान सरपंच सोसायटीचे चेअरमन ,सदस्य ,रिसे-पिसे.खोपडेवाडी,भगत वस्ती येथील शेतकरी,सर्वसामान्य व्यक्तींकडून एक लाख पंचावन्न हजार रुपये निधी जमा झाल्याचे मुख्याद्यापक विजय काकडे यांनी सांगितले .
रिसे पिसे हायस्कुल येथी शिक्षक, शिपाई ,क्लार्क .शिक्षिका यांच्यामाध्यमातुन शाळेसाठी दोन वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी पंचावन्न हजार रुपये एवढा निधी जमा झाल्याचे शिक्षक मधुकर कदम यांनी सांगितले.रिसे पिसे येथील ग्राउंड सपाटीकरणाच्या निधीसाठी सामाजिक स्तरातून भरीव निधी गावकर्यांनी दिला असल्याचे उद्योजिका सुरेखा गोळे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
यावेळी सरपंच रमेश पिसाळ उपसरपंच रुपाली गायकवाड ,रुपाली बोरकर पोलीस पाटील रिसे, ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा बोरकर,माजी सरपंच विजय गोळे,माजी सरपंच देवराम गोळे,माजी सरपंच विश्वास आंबुले, रवींद्र कामथे सदस्य ,गजानन बोरकर,वि .का सोसायटीचे चेअरमन हरिभाऊ गायकवाड,सोमनाथ चव्हाण , सरपंच रोहन मुळीक ,उद्योगपती संतोष मुळीक,प्रदीप हांडे ,बाळू कुंभार, माजी सरपंच दीपक मुळीक, माजी विध्यार्थी,विद्यार्थिनी,शेतकरी जेष्ठ नागरिक,महिला युवक वर्ग गंगाराम ठोंबरे, सतीश गोळे,रमेश मुळीक,सुरेखा गोळे,मुख्याद्यापक विजय काकडे,शिक्षक,बहुसंख्येने आदी उपस्थित होते.