सुनील भंडारे पाटील
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाले, स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त ग्रामपंचायत पेरणे (ता. हवेली) येथे प्रभात रॅली काढण्यात आली,
गावांमधील माध्यमिक,प्राथमिक व अंगणवाड्या यामधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता, देशभक्ती, स्वातंत्र्य दिन च्या घोषणा देत, तिरंगा हातामध्ये घेऊन, संपूर्ण गावांमधून प्रभात रॅली काढण्यात आली, यावेळी गावांमधील ग्रामस्थांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचा दिसत होता, सामुहिक राष्ट्रगीत घेण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली,
या प्रसंगी सरपंच रुपेश (बापू) चंद्रकांत ठोंबरे, उपसरपंच वर्षा अतुल वाळके, सदस्य शिवाजी वाळके मुख्याध्यापक हरेल बढे सर, अंगणवाडी मुजावर ताई ग्राम विकास अधिकारी के, ल, थोरात, ग्रामपंचायत क्लार्क सोमनाथ रांगोळे,निशांत कुंभार, संदीप भंडलकर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते,