सुनील भंडारे पाटील
शिरूर हवेली मतदार संघ तसेच भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय माजी आमदार बाबुरावजी पाचरणे यांचे आज सकाळी 11:43 वाजता निधन झाले,
पाचरणे यांच्या निधनाने शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात तसेच भारतीय जनता पार्टी पक्ष, बाबुराव पाचरणे समर्थक यांच्यामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला असून शिरूर हवेली व आसपासच्या तालुक्यामधून तसेच पुणे शहराकडून शिरूरकडे पाचरणे यांच्या घरी जाण्याचा कार्यकर्त्यांचा ओघ वाढला आहे,
माजी आमदार बाबुरावजी पाचरणे यांची राजकीय कारकीर्द उल्लेखनीय होती त्यांचे मूळ गाव तरडोबाची वाडी, या ठिकाणी त्यांचा जन्म 1952 साली झाला, त्यानंतर तरडोबाची वाडी गावचे सरपंच ते शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये निष्ठेने काम अशी राजकीय कारकीर्द मोठी आहे, सरपंच, पंचायत समिती, मार्केट कमिटी, घोडगंगा साखर कारखाना, जिल्हा परिषद, सभापती, आणि दोन वेळा आमदार अशी राजकीय कारकीर्द त्यांची दमदार होती, त्यांच्या जाण्याने त्यांचे गाव, भावकी, शिरूर, हवेली, शेजारील तालुके, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे,