सुनील भंडारे पाटील
पिंपरी सांडस (ता. हवेली) येथील हरपळे वस्ती नलगेमळा रोडला बिबट्याचे ठस्से आढळून आले आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी बुर्केगाव येथे बिबट्याने दोन शेळ्यावर हल्ला केला होता.
सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी बिबट्याचे वास्तव्य, शेतकऱ्यांवर आणि पाळीव जनावरांवर हल्ले होत आहेत, त्यामुळे सध्या सर्वत्र बिबट्याच्या भीतीचे वातावरण तयार झाले आहे, शिरूर हवेली मध्ये भीमा नदीचा पट्टा सदन शेती, मोठे बागायत क्षेत्र म्हणून समजला जातो, नदीच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात ऊस बागायत क्षेत्र आहे, उसामध्ये दडणीसाठी प्राण्यांना आसरा मिळत असल्याने, वेगवेगळे वन्यजीव वास्तव्य आहे, त्यांच्या शिकारीसाठी या भागामध्ये बिबट्याची राहुटी आहे, पिंपरी सांडस व आसपासच्या परिसरात बिबट्याचे दर्शन व मातीमध्ये पावलांचे ठसे पहावयास मिळत आहेत,
तरी सदर ठिकाणी पिंजरा लावण्याबाबत नागरिकांची विनंती केली आहे. परिसरात बिबट्याचा वाढलेला वावर लक्षात घेता यावर काय उपाय योजना करता यासंबंधी शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार, वनविभाग यांना कळविण्यात आले असून , आज वन विभाग अधिकारी संबंधित ठिकाणी पंचनामेसाठी येतील नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आले आहे, परिसरात तातडीने पिंजरे लावण्यात येणार आहे. ठसे, पशुंवर हल्ला झाल्यास, बिबट्या आढळल्यास त्वरित संपर्क करा, वन विभागाशी समन्वय साधून तातडीची कारवाई करण्यात येईल, असे वन विभागाच्या अधिकार्यानी सांगितले,