शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला
तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) येथील गुजर प्रशालेत आयोजीत या कार्यक्रमात प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, उपमुख्याध्यापिका सुनिता पिंगळे, प्रशालेतील सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख शिवाजीराव आढाव तसेच अरुण भगत, सुरेंद्र ठुबे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी प्रशालेची विद्यार्थिनी श्रुतिका नांदखिले हिने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच शिवाजी आढाव यांनीही कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्वावलंबी शिक्षणाबद्दल तसेच त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल व त्यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्रशालेचे पर्यवेक्षक मोहन ओमासे यांनी आभार मानले.