सुनील भंडारे पाटील
शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा जवळ आल्यामुळे, जनावरांमधील लंपी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बैलपोळ्याला बैल एकत्र आणण्यावर बंदी घालण्यात आली असून शासनाने आदेश जारी केला आहे,
गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांमध्ये लंपि या चर्मरोगाने धुमाकूळ घातला असून शिरूर तालुका तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये लसीकरण चालू आहे, या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बैलपोळा सणामध्ये बैल एकत्र आणण्यावर शासनाने बंदी घातली आहे, महाराष्ट्र शासन तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय शिरूर, यांच्या वतीने शिरूर तालुक्यातील सर्व गावांमधील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी यांना लेखी स्वरुपात सूचना देण्यात आले आहेत, या आदेशामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव फक्त गोवंश पशु धना मध्ये आढळून आला असून, महाराष्ट्र हे नियंत्रित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे, हा रोग नियंत्रित ठेवण्यासाठी गुरे, म्हशींचा बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे, पशुधनाची वाहतूक करणे, तसेच शेतकऱ्यांच्या महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा, व मिरवणूक यामुळे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने बैल एकत्र आणण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, ग्रामपंचायतीने याबाबतच्या सूचना, नोटीस बोर्ड, फ्लेक्स किंवा दवंडी देऊन सर्व पशुपालक यांना कळविण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे,