सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कान्हूर मेसाई (तालुका शिरूर) ग्रामस्थांची विजेची समस्या बाजार समिती सभापती *शंकरदादा जांभळकर* यांनी *मा. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील* साहेब यांच्या कानावर घातली. साहेबांनी देखील तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोनवर सूचना दिल्या आहेत.
लवकरच कान्हूर मेसाई येथील घोलपवाडी, उकिर्डे वस्ती, मळई वस्ती या ठिकाणी नवीन रोहित्रसाठी (ट्रान्सफॉर्मर) मंजुरी मिळणार आहे. गेल्या आठवड्यात ग्रामस्थांनी विजेच्या समस्येचा पाढा वाचला होता. यावर्षी शेतकऱ्यांना सुखावणारा पाऊस पडला आहे. यावर्षी जास्त काळ विहिरीत पाणी शिल्लक राहणार असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले होते, परंतु विहिरीत पाणी असूनही शेतात चांगली पिके घेता येणार नाही कारण घोलपवाडी, उकिर्डे वस्ती, मळई वस्ती या तीन ठिकाणी गेल्या अनेक वर्षांची नवीन रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बसविण्याची मागणी होती. ती मागणी आता पूर्णत्वास जाण्यासाठी पाहिले पाऊल उचलले आहे. ग्रामस्थांच्या विशेष प्रयत्नातून हे काम लवकरच पूर्ण होणार आहे,