गुनाट प्रतिनिधी : एकनाथ थोरात
ही निवडणूक कोण्या स्थानिक स्वराज्य संस्थेची किंवा सहकार क्षेत्रातील नव्हती , तर ती होती वर्गमंत्री मंडळाची ! विठ्ठलवाडी(ता. शिरूर ) येथाल श्री . पांडुरंग विद्या मंदिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना लोकशाहीतील ' मतदान प्रक्रिया ' समजून देण्याच्या दृष्टीने हा अभिनव उपक्रम राबविला .
यावेळी निवडणूकीची घोषणा ते निकाला पर्यंत विद्यार्थ्याना पुरेसा वेळ देण्यात आला . प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राध्यक्ष , मतदान अधिकारी , पोलिस अधिकारी इ ची विद्यार्थ्यां मधुन निवड करून त्यांचेकडुनच याविषयी प्रक्रिया पूर्ण करून घेतली . मतदान कक्ष उभारून मतपेटी ठेवण्यात आली होती .
यावेळी इ . ८ वी च्या ३८ मतदार विद्यार्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला व ७ वर्गप्रतिनिधी निवडून दिले .त्यात विद्यार्थी विकास पॅनेलचे अनमोल गवारी,ओम कातोरे , सम्यम लोंढे , लोले पार्थ , हंबीर विराज , लोले सार्थक , गवारी सूयश हे विद्यार्थी निवडून आले . अभय गवारी , प्रगती पायगुडे , श्रेया लोले , आयुष गवारी , साईराज गवारी, सार्थक गवारी, विशाल नागरे इ विदयार्थ्यांनी मतदान अधिकारी म्हणून काम पाहिले .शिक्षिका योगिता हरगुडे व संगीता लंघे यांनी निरिक्षक , अरुण शिदे व प्रविण जगताप यांनी मतमोजणी तर प्रभाकर चांदगुडे यांनी निकाल घोषित केला .
मुख्याध्यापक बी.वाय. वाघ यांचे मार्गदर्शनाखाली वर्गशिक्षक बी ई . गायकवाड यांनी हा उपक्रम राबविला .
शालेय जिवनापासूनच विद्यार्थ्यांना लोकशाहीतील मतदान प्रक्रिया समजावी . नवभारताची मतदान साक्षर पिढी तयार व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविला - बी वाय. वाघ - मुख्याध्यापक