सासवड :प्रतिनिधी :बापू मुळीक
पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळ,वाघापूर संचलित पारेश्वर विद्यालय, पारगाव मेमाणे या विद्यालयात महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे शाखा पुरंदर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय मुक्तछंद चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळ वाघापूर संस्थेचे अध्यक्ष सतीशशेठ उरसळ, कार्याध्यक्ष अजितराव निगडे,पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर भाऊ कामठे, उपाध्यक्ष बापूसाहेब कुंजीर, उत्तमराव उरसळ, शाळा समिती अध्यक्ष बापूसाहेब मेमाणे, लक्ष्मणराव गायकवाड, सरपंच प्रियंका मेमाणे, सर्व सदस्य, शिक्षण विस्ताराधिकारी पांडुरंग मेमाणे, चित्रकार रामकृष्ण कांबळे, कला अध्यक्ष श्रावण जाधव, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, कुंडलिक मेमाणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक तुकाराम मुळीक यांनी केले. लोक नायक स्वर्गीय शंकरराव उरसळ यांच्या कार्याची आठवण तरुण पिढीला व्हावी व चित्रकला स्पर्धेतून उत्कृष्ट चित्रकार निर्माण होऊन कला वाड्मय वृद्धिंगत होण्याची अपेक्षा कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीशशेठ उरसळ यांनी व्यक्त केली. तालुका स्तरीय मुक्त छंद चित्रकला स्पर्धेत तालुक्यातील 26 शाळांमधील सोळाशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गुरुकुल माध्यमिक विद्यालय सासवड या शाळेने प्रथम क्रमांकाचा फिरता चषक पटकावल्या बद्दल रोख तीन हजार रुपयाचे बक्षीस देऊन विशेष कौतुक करण्यात आले. तसेच प्रथम 7 क्रमांकांना ट्रॉफी प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी जालिंदर भाऊ कामठे यांनी पुढील वर्षी पुरस्कारार्थीना विशेष रोख रक्कम देण्याचे जाहीर करत,प्राचार्य नंदकुमार सागर, प्राचार्य राहुल येळे, रामकृष्ण कांबळे, श्रावण जाधव, दत्तात्रय परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले. सुदेही कांबळे या विद्यार्थिनीने उत्कृष्ट भाषण केल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. मच्छिंद्र कुंभारकर, सचिन हगवणे, संगीता कुंजीर, दत्तात्रय गायकवाड, सोमनाथ इंदलकर सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक वृंद, पुरस्कारार्थी विद्यार्थी, पालक विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. पुरंदर तालुका कला अध्यापक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय परदेशी, शंकर वाघमारे, सुहास वाघमारे, किशोर शितोळे यांनी नियोजन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उस्मान मण्यार तर आभार दत्तात्रय बधे यांनी मानले.