शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
तळेगाव ढमढेरे (तालुका शिरूर) येथील कौस्तुभकुमार गुजर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सहकार विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सहकार विभागाच्या अध्यक्षा ऍड.शुभांगी शेरेकर यांनी गुजर यांना निवडीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते समारंभपूर्वक दिले आहे.
काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे डोळ्यासमोर ठेवून पक्ष बळकटीसाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याने व सहकार क्षेत्रात कार्यरत असल्याने गुजर यांची ही निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर बोलताना गुजर यांनी सांगितले की पक्षसंघटनेच्या माध्यमातून सहकार विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. निवडीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुजर यांचा सत्कार केला,