रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
महाराष्ट्र राज्य औद्योगिक परिषदेच्या वतीने दिला जाणारा भारतरत्न जे आर डी टाटा "कृषी उद्योग पुरस्कार" आमदाबाद ता. शिरूर येथील महिला शेतकरी सौ मनिषा दत्तात्रय जगताप यांना गुरूवार दि. १५ सप्टेंबर रोजी ॲटो क्लस्टर सभागृह चिंचवड येथे डॉ. डी वाय पाटील विद्यापिठाचे कुलपती डॉ पी. डी. पाटील व टाटा उद्योगसमूहाचे मा. व्यवस्थापक मनोहर पारळकर यांच्या हस्ते देण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन वृक्षपुजन करून करण्याचा मान ही सौ मनिषा दत्तात्रय जगताप यांना मिळाला. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्याचा मान जेंव्हा खेडेगावातील एका कर्तबगार शेतकरी महिलेला मिळाला तेंव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
आपला पती शिक्षणक्षेत्रात काम करताना नावलौकीक मिळवत आहे मग मीसुद्धा माझ्या शेती व्यवसायात काहीना काही केले पाहिजे म्हणून शेतात डाळिंब, सफरचंद, ऊस, ॲप्पल बोर, पेरू, आंबा, कांदे, बटाटे व इतर भाजीपाला पिके घेऊन परिसरातील शेतकर्यांना एक दिशादर्शक काम करावे या उदात्त हेतूने शारीरिक कष्टाची पर्वा न करता स्वतःला वाहून घेऊन आदर्श शेती करावी असा मानस बाळगून शेतमजूरांसोबत काम केले. व त्याचे फळ म्हणून मला डॉ पी डी पाटील व टाटा चे मा. व्यवस्थापक मनोहर पारळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाण्याचे भाग्य लाभले हा माझ्या जिवनातील सर्वोच्च पुरस्कार आहे . असे सत्काराला उत्तर देताना सौ मनिषा दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.
यावेळी राज्यातील नामवंत उद्योजकांना ही सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेचे अध्यक्ष सुदाम राव भोरे, परिषदेचे कार्याध्यक्ष पुरूषोत्तम सदा फुले, मुरलीधर साठे, सुरेश कंक, राजेंद्र वाघ, इंद्रजित पाटोळे, जयवंत भोसले, वर्षा बाल गोपाल , दिपक चांदणे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले यांनी केले. व सर्वांचे आभार बाजीराव सातपुते यांनी मानुन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.