सुनील भंडारे पाटील
खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर संघ राजगुरुनगर, खेड यांच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्यांना आदर्श पुरस्कार दिले जातात,
वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय तील सोमनाथ बबन भंडारे सर यांना पुणे जिल्ह्यातील " जिल्हा गुणवंत शिक्षक " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, शिक्षण क्षेत्रात काम करत असताना त्यांनी अतिशय निष्ठेने व प्रामाणिकपणे काम केले आहे, त्यामुळे शाळेची त्याच प्रमाणे तालुक्याची व जिल्ह्याची शैक्षणिक व भौतिक गुणवत्ता वाढण्यास मदत झाली आहे, याचा खेड तालुका माध्यमिक शिक्षण क्षेत्रास सार्थ अभिमान आहे, हा सन्मान खेड येथील रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय पुणे नाशिक हायवे, चांडोली राजगुरुनगर येथे कार्यक्रमात देण्यात आला, या पुरस्काराचे सन्मानित झालेले भंडारे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे,