सासवड प्रतिनिधी बापू मुळीक
सासवड (ता.पुरंदर) येथे सोपाननगर येथील सेवानिवृत्त शिक्षक अशोक गुरव, सेवानिवृत्त शिक्षिका सुनीता गुरव, सामाजिक कार्यकर्ते अजय अशोक गुरव, शुभदा उदय गुरव, तन्वी अजय गुरव यांनी इस्रोचा देखावा सादर करून विज्ञान निष्ठपणा जपला आहे.
गणेशोत्सवानिमित्त घरगुती गणपतीसमोर अनेक सामाजिक आशय असलेले देखावे करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. त्यामध्ये सासवड येथील गुरव परिवाराने अंतराळ विषयक माहिती देणाऱ्या इस्रोचा (ISRO) देखावा आकर्षकपणे तयार केलेला आहे. या देखाव्याची मूळ संकल्पना तन्वी अजय गुरव हिने मांडली. हा देखावा पाहण्यासाठी त्यांच्या घरी अनेकजण गर्दी करत आहेत.