सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
शिरूर तालुक्यातील सविंदणे - कान्हूर शिवेलगत दोन्ही बाजूंनी डोंगरभाग असलेने व लवनात ओढ्यांनी भरपूर पाणी असलेने तेथे वाघांचा सर्रास वावर आहे . जंजंळ या डोंगरा आड असलेल्या फटांगडे वस्तीवर तर बऱ्याचदा त्याचे दर्शन होते . खास वाघांच्या चाहुलीसाठी बसविलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या बऱ्याचदा दिसला आहे. काल कान्हूर मेसाई येथील तरुण पिकपमध्ये सविंदणेहून कान्हूरकडे येत असता त्यांना फटांगडे यांचे रानात प्लाटींग शेजारच्या रस्त्यावरून आडवा जाणारा बिबट्या पाहता त्यांनी पिकप थांबवली व तो बाजूचे रानात जात असता त्याचेवर गाडीची लाईट मारली तेंव्हा तो संथ गतीने बाजूचे बांधा कडेने झुडूपां आड गेला .
तेंव्हा ते हा वाघ लायटीला घाबरतो म्हणून व्हिडीयो काढला . महिन्या पंधरा दिवसांनी तो बाजूच्या डोंगरातील धोत्रे, कोळेकर , लंघेवस्ती वरील नागरीकांना दिसतो . डोंगर भागात उसाचे क्षेत्र नसले तरी विरळ वस्ती सभोवती दाट झाडी असल्याने त्याला लपण्यास जागा आहे . सविंदणे वरून रात्री अपरात्री याच रोडवरून लोकांना येजा करावी लागते .तरी वनविभागाने पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त करावा अशी परिसरातील शेतकरी व नागरीकांची मागणी आहे. वाघ हा लाईट व फटाक्या सारख्या मोठ्या आवाजाला घाबरतो, तरी त्यांचा वापर करावा . आपण सारेच त्या शूर धुरंधरा प्रमाणे वाघासी दोन हात करून परीवार जितराबं वाचवू शकणार नाही , पण लाईट व आवाजाचा वापर करावा असे वाघ पहाणाराने सांगितले .