सासवड :प्रतिनिधी बापू मुळीक
गेलीं सोळा वर्षांहून अधिक काळ शहर व परिसरात पत्रकारिते बरोबरच सातत्याने विविध सामजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवणाऱ्या सासवड शहर पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी जाहीर झाली आहे. सासवड येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या. ज्येष्ठ पत्रकार सुधीर गुरव यांची संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर गणेश मुळीक सचिव पदाची धुरा सांभाळणार आहेत
नवनियुक्त कार्यकारणी.. अध्यक्ष सुधीर यमाजी - गुरव, उपाध्यक्ष - जीवनकुमार प्रभाकर कड, सचिव - गणेश लक्ष्मण मुळीक, खजिनदार हेमंत चंद्रकांत ताकवले, सदस्य श्रीकृष्ण नेवसे, बाळासाहेब कुलकर्णी, संभाजी महामुनी, बापू मुळीक , गौरव कोलते, नितीन यादव, मनोज मांढरे, जगदीश शिंदे, तानाजी सातव, शकील बागवान, संदिप जगताप व सुनिल वढणे... शहर व परिसरातील अनेक नागरिकांनी नवीन कार्यकरणीचे अभिनंदन केले आहे.