लोणी काळभोर अनिकेत मुळीक
वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करताना पोलीस स्वतःच्या खाजगी मोबाईल फोनवर ई चलन करू शकत नाही.अर्जदार दिपक शंकर पाटील यांनी माहिती अधिकार २००५(अ) यांचा दि. १८/०८/२०२२ रोजीचा तकार अर्जांमधून माहिती उघडा
माहिती अधिकार अर्जावर उत्तर देताना लेखी स्वरूपात,संबंधित विषय व संदर्भान्वये कळविण्यात येते की, कसूरदार वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करताना फोटो काढण्यासाठी स्वत:च्या खाजगी मोबाईलचा वापर न करता ई चलान मशिनव्दारेच सर्व कारवाई केली जाईल याबाबत खबरदारी घ्यावी याकरीता या कार्यालयाचे पत्र क्र.अपोमसं(वा.)/४४/वाचक/ई-चलान/७४३/२०२० दि. २/०३/२०२० अन्वये सर्व घटकप्रमुख /नोडल अधिकारी यांना आदेशित करण्यात आले आहे.
काही पोलीस घटकांतील पोलीस अधिकारी/अंमलदार कसूरदार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करताना स्वत:च्या खाजगी मोबाईलवर वाहनाचा फोटो/चित्रीकरण करून काही कालावधी नंतर ई चलान मशिन मध्ये अपलोड करतात तसेच गाडीचे संपूर्ण फोटो न टाकता फक्त नंबर प्लेटचा फोटो टाकतात त्यामुळे गाडी कोणती आहे हे ओळखणे अशक्य होते अशा आशयाचा तकार अर्जवरील संदर्भान्वये प्राप्त झाला आहे.
याबाबतk की, कसूरदार वाहनचालकावर कारवाई करीत असताना फोटो/चित्रीकरण करण्याकरीता स्वत:चा खाजगी(वैयक्तीक) मोबाईलचा वापर न करता फक्त ई चलान मशिनचाच वापर करावा. तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार यांचेकडील ई चलान मशिनबाबत काही समस्या/अडचणी असल्यास संबंधित मे.क्रिश इंट्राट्रेड प्रा.लि.यांच्या जिल्हा प्रतिनिधीकडून निवारण करून घ्यावे.
ई-चलान कारवाई करण्याकरीता जे पोलीस अधिकारी/अंमलदार स्वत:च्या खाजगी(वैयक्तीक) मोबाईलचा वापर करतील त्यांचेवर योग्य ती कारवाई करावी. असेही आदेशात म्हटले आहे, संबंधित आदेश
(कुलवंत कु. सारंगल), अपर पोलीस महासंचालक (वाहतुक),
महाराष्ट्र राज्य, मुंबई. यांनी
१) पोलीस आयुक्त, मुंबई शहर ठाणे शहर /नवी मुंबई/मिरा भाईदर वसई विरार(सस्नेह सादर)
पोलीस आयुक्त, पुणे शहर नागपूर शहर पिंपरी-चिंचवड/नाशिक शहर/औरंगाबाद शहर सर्व महाराष्ट्र राज्य, यांना दिला आहे, ही सर्व माहिती माहिती अधिकार कायद्यामुळे जनतेसमोर आली,