शिरूर विशेष प्रतिनिधी
मलठण तालुका शिरूर येथे गणेश उत्सवा निमित्त शुक्रवारी (दिनांक २) रोजी गणेशाची महाआरती टाकळी हाजी चे नवनिर्वाचित सरपंच अरूणाताई दामुशेठ घोडे आणि माजी आदर्श सरपंच दामुशेठ घोडे यांच्या शुभहस्ते तसेच माळवाडी गावचे प्रथम सरपंच सोमनाथ भाकरे आणि टाकळी हाजी, माळवाडी या गावांतील नवनिर्वाचित सदस्य तसेच मलठण गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
मलठण ग्रामस्थांनी दामुआण्णा घोडे आणि सहकाऱ्यांचे जंगी स्वागत केले. गावातून पेठेतून मिरवणूक काढून त्यांना गणेश मंदिरापर्यंत वाजत गाजत नेण्यात आले. तिथे सर्वांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी टाकळी हाजी चे उपसरपंच गोविंद गावडे, माळवाडी चे उपसरपंच आनंदा भाकरे तसेच दोन्हीही गावांतील नवनिर्वाचित सदस्य,मलठण गावचे उद्योजक नाना फुलसुंदर, बंटी बोडरे, संतोष गायकवाड,किरणशेठ देशमुख,विक्रम मावळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. शिवसेना पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश जामदार यांनी सूत्रसंचालन केले. आभार मलठण गावच्या माजी सरपंच शशिकला फुलसुंदर यांनी मानले.