शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
शिक्षक हाच समाजाचा खरा कणा असल्याचे प्रतिपादन शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी केले.
तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) येथे रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे बोलत होत्या. या कार्यक्रमात शिरूर तालुक्यातील २५ शिक्षकांचा शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे होत्या. यावेळी जि. प. सदस्या कुसुम मांढरे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर, उद्योजक संदीप ढमढेरे, माजी गटशिक्षणाधिकारी सोपानराव वेताळ, शिरुर तालुका मुख्याध्यापक संघांचे सचिव मारुती कदम, प्राथमिक पतसंस्थेचे अध्यक्ष म्हातारबा बारहाते, अनिल पलांडे, प्राचार्य रामदास चव्हाण, रोटरीचे संचालक रमेश भुजबळ, लधाराम पटेल, प्रितम शिर्के डॉ. हारदे, भाकरे सर, आदी मान्यवर उपस्थित होते. रोटरीच्या पुरस्काराचे हे नववे वर्ष आहे. याप्रसंगी रोटरीचे माजी सचिव डॉ मच्छिंद्र गायकवाड, शिक्रापूरचे उपसरपंच मयुर करंजे, पब्लिक इमेज डायरेक्टर मनोहर परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजीव मांढरे यांनी केले तर राहुल चातुर यांनी आभार मानले.