सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मौजे सांगवी धनगरवाडी शिवारातील २ बिबटे बोक्याप्रमाणे सरसर नारळाच्या झाडावर चढतानाचा व्हीडीओ सगळीकडे व्हायरल झाल्याने सगळीकडे प्रचंड खळबळ उडाली आहे,
बिबटे हे पहिले उसाच्या भागातच दिसत होते, पण अलिकडे मांदळवाडी सविंदणे घोलपवाडी सारख्या ग्रामीण डोंगराळ भागातही रोजच दिसू लागले आहेत . हे बातम्यांद्वारे वन विभागाचे रेकॉर्डलाही पोचले आहे , पण ते जणू चार दोन माणसांचे बिबट्यांचे तोंडून मुडदे पाडण्याची वाट पाहत असावेत .मग शासनाला १० - २० लाखांची मृतांना नुकसान भरपाई देणे परवडेल, पण अगोदरच शहाने होत पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करणे हितावह वाटत नसावे, बिबट्याचा हा व्हिडीओ नक्की पहा आणि शेतकरी वर्गाने दक्षता घ्या, कारण बिबटया कुठल्याही प्रकारे हल्ला करू शकतो, त्याचे पूर्ण पणे लक्सने ही मांजरा प्रमाणे आहे, झाडावर चढून, जम्प मारून बिबटया प्राणघातक हल्ला करू शकतो, म्हणून शेताकऱ्यांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे, बिबट्याचे हल्ले हे नेहमी सायंकाळी होत आहे, म्हणून सायंकाळी 6 नंतर सावध राहावे,बिबटे झाडावर देखील सर सर चढू शकतात हा व्हिडीओ धाडसी शेताकऱ्यांनी शूट केला सलाम या शेतकऱ्याला,
तरी शिरूर आबेगावचे सिमेवर सविंदणे मांदळवाडी घोलपवाडी भागात रोजच दिसणाऱ्या बिंबट्यांचा पिंजरे लावून बंदोबस्त करावा अशी मागणी मांदळवाडीचे सरपंच कोंडीभाऊ आदक , सविंदणेचे ऊपसरपंच भाऊसाहेब लंघे, चांगदेव कोळेकर , घोलपवाडीचे बाळासो घारे व डोंगर भागातील फटांगडे परीवारांनी केली आहे.