सासवड :प्रतिनिधी :बापू मुळीक
प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना पुरंदर तालुका व सासवड शहराच्या हद्दीतील दिव्यांग बांधवांना शिधापत्रिका पुरंदर हवेली चे आमदार संजयजी जगताप व सुरेखा ढवळे प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना महिला अध्यक्षा यांच्या पाठपुराव्यामुळे शिधापत्रिका वितरण,
पुरंदर तालुक्याच्या तहसीलदार रूपाली सरनोबत संजय गांधी समिती अध्यक्ष व काँग्रेसच्या महिला अध्यक्ष सुनीता कोलते, नायब तहसीलदार गाडगे रावसाहेब, पुरवठा अधिकारी सुधीर फडके, पुरवठ्याच्या क्लार्क महिला नागपुरे, संजय गांधी समिती सदस्य पत्रकार संभाजी महामुनी, पुरंदर तालुका अध्यक्ष शिवाजी शिंदे, महिला अध्यक्ष रेखा धुमाळ ,उषा भिसे, योगीराज जगताप, रूपाली जगताप, सहभागी दिव्यांग बांधव यांच्या उपस्थित पिवळी शिधापत्रिका वितरण करण्यात आल्या यावेळी 20 डिसेंबर 2000 वी च्या शासन निर्णयाप्रमाणे दिव्यांग बांधवांचे 102 अर्ज तहसीलदार कार्यालय मध्ये दाखल करण्यात आले होते दीड वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर आज पहिला टप्प्यात शासनाच्या निकषात बसणारे व शासन निर्णयाला अधिक राहून तहसील कार्यालयाच्या नियमात बसेल अशा 30 दिव्यांग बांधवांना पिवळी शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या संपूर्ण पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात दिव्यांगांना प्रथमच पिवळी शिधापत्रिका मिळत आहे याचा मनस्वी आनंद होत आहे असे उदगार कार्यक्रमाचे आयोजन करून सुरेखा ढवळे केले सूत्रसंचालन संभाजी महामुनी यांनी केले