वाघोली (तालुका हवेली) येथील नगर रोडवर असलेली सागर वाईन्स व गेलाॅर्ड वाईन्स ही दारु दुकाने माहिती सेवा समितीचे माध्यमातून गेले अनेक वर्षांपासून तक्रारी केल्यानंतर ती आव्हाळवाडी रोडवर स्थलांतरित झाली होती परंतु पुन्हा सागर वाईन्स नगररोडवर पुन्हा स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्यावर माहिती सेवा समितीचे माध्यमातून अनुक्रमे १६/०३/२०२१ व १७/०५/२०२२ रोजी सर्व पुरावे देऊन तक्रारी दाखल केल्या त्यामध्ये जागा बिगरशेती नाही , ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र नाही,अशी अनेक कागदपत्रे दाखल केली होती यापूर्वी मी केलेले सर्व तक्रार अर्ज, सर्व वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेल्या बातम्या, वाघोली ग्रामपंचायत यांचा दुकान बंद करण्याचा ठराव, वाहतूक जॅम होने , फुटपाथवर चालणार्या महीलांना होणारा मध्यपींचा त्रास , बाजूला असलेली हाॅस्पीटल या सर्व बाबींबाबत पुरावे दिले होते त्याचाच संदर्भ देउन दुकानासाठी स्थलांतरासाठी परवानगी नाकारली आहे.
त्यामध्ये वाघोली येथील संदीप सोमनाथ सातव संघटक सचीव भारतीय जनता पार्टी, चंद्रकांत गोविंद वारघडे अध्यक्ष माहिती सेवा समिती, दादासाहेब बबनराव सातव उपाध्यक्ष पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी, संदिप माणीकराव गोते , पत्रकार दीपक नाईक,विजय जाचक अध्यक्ष भारतीय जनता पार्टी हवेली तालुका क्रीडा आघाडी, या सर्वांनी दुकान स्थलांतरित होऊ नये म्हणून तक्रारी अर्ज केला होता त्यामध्ये चंद्रकांत गोविंद वारघडे यांनी फोनवर सांगितले की माझा तक्रारी अर्जा प्रमाणे विरोध दर्शवला आहे हाच माझा जबाब,विजय जाचक यांनी कार्यालयात हजर राहून विरोध असल्याबाबत जबाब नोंदवला आहे, त्यानंतर आदेश पाहता तक्रार दार संदिप सोमनाथ सातव यांनी नंतर त्यांचे लेटरहेड वर लेखी दिले की सर्व कागदपत्रे योग्य असल्याने परवानगी देण्यास माझी हरकत नसल्याचे कळवले आहे.
परंतु चंद्रकांत वारघडे व विजय जाचक व ईतर यांनी मात्र विरोध दर्शवला असल्याने दुकानास स्थलांतर करण्याची परवानगी नाकारली आहे.
आज मी उत्पादन शुल्क अधिक्षक रजपूत साहेब यांना भेटून माहिती दिली व परवानगी नाकारली तरी दुकान स्थलांतरित कसे झाले परंतु त्यांचेकडून योग्य उत्तर कींवा त्याबाबत कागदपत्रे मिळाली नाही त्यामुळे पुन्हा एकदा कागदपत्रांची मागणी करणार आहे व वेळ आल्यास वाघोली येथील माहिती सेवा समितीच्या महीला पदाधिकारी यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषणास बसणार आहे. अशी माहिती चंद्रकांत गोविंद वारघडे (अध्यक्ष माहिती सेवा समिती) यांनी दिली,