सुनील भंडारे पाटील
पुणे नगर महामार्ग रस्ता स्टार, मात्र अपघाताचे प्रमाण वाढले
फार, संबंधित महामार्गावर वाघोली ते शिरूर पर्यंतच्या रस्त्याचे काम रुंद व
चांगले झाले आहे, या गोष्टीचा फायदा घेत वाहन चालक सुसाट वाहने
पळवण्याच्या नादात घडत आहेत अपघात, बेशिस्त वाहनचालक, वाहनांचा अति वेग, वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे
अपघाताच्या प्रमाणामध्ये वाढ झाली असून खरंच यावर नियंत्रण ठेवण्याची गरज
आहे, वाघोली पासून पुढे, बी जे एस कॉलेज फाटा, सहावा मैल, लोणीकंद, आळंदी
फाटा, पेरणे फाटा, कोरेगाव भीमा, डिग्रजवाडी फाटा, कल्याणी फोर्स चौक,
सणसवाडी, एल अँड टी फाटा, बजरंगवाडी, शिक्रापूर चाकण चौक, शिक्रापूर
जातेगाव चौक, कासारी फाटा, रांजणगाव गणपती, सरदवाडी, न्हावरा फाटा, अशी
अनेक महत्त्वाचे ठिकाणे अपघाताचा स्पॉट बनलेली आहेत, त्यामुळे अशा ठिकाणी
मालवाहतूक गाड्या, चार चाकी गाड्या, कंटेनर्स, कार,
दुचाकी वाहने, यांना वाहतुकीच्या नियमांचा चाप बसणे गरजेचे आहे, जेणेकरून
बेशिस्त वाहन चालकांना जरब बसेल, वेगावर नियंत्रण राहील, त्याचप्रमाणे
गावागावातील चौक त्यांना समजेल, या महामार्गावर रोजच अपघात घडत आहेत रोज
कोणाचा ना कोणाचा जीव जात आहे, हे कुठेतरी थांबले पाहिजे,
महामार्गावर
होणारे अपघात गावांना जोडणारे फाटे, चौक, वळण रस्ता अशा ठिकाणी होत
असल्याने, त्या ठिकाणी गतिरोधक, सिग्नल, सूचना फलक, वेग मर्यादा फलक बसविणे
गरजेचे आहे, संबंधित खात्याने याचा विचार करावा अशी मागणी नागरिकांनी केली
आहे
बीजेएस फाटा, कोरेगाव
भीमा, सणसवाडी या ठिकाणी होणाऱ्या सततच्या वाहतुकीच्या कोंडीमुळे या
चौकांमध्ये गतिरोधक, सिग्नल, वाहतूक नियंत्रण पोलीस कंपल्सरी असायला
पाहिजेत अशा स्वरूपाची चर्चा नागरिकांमध्ये आहे,