शिरूर विशेष प्रतिनिधी
टाकळी हाजी (तालुका शिरूर) येथील मा.बापूसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी संघटना सन २०२२-२७ कार्यकारणी जाहीर करण्यात आली.गेले तेरा वर्षापासून ही संघटना कार्यरत आहे.या संघटना माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम पार पडले आहेत.
संभाजी साबळे(अध्यक्ष), दत्तात्रय मुसळे(उपाध्यक्ष),
बाबाजी रासकर(सचिव), विजय थोरात(कार्याध्यक्ष), स्वप्निल गावडे(संपर्कप्रमुख),अनिल पखाले(संघटक), धोंडीभाऊ गावडे(कोषाध्यक्ष),भरत घोडे(सोशल मीडिया प्रमुख), नितीन गावडे(सरचिटणीस), किरण भाईक(खजिनदार), योगेश भाकरे(सहसचिव), दत्तात्रय शिंदे(सांस्कृतिक विभाग प्रमुख), शशिकला चोरे(महिला विभाग प्रमुख),संचालक मंडळ - कल्पना हिलाळ,अर्चना सोदक, प्रतिक साबळे
या निवडीबद्दल शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेच्या सदस्या सुनिता गावडे, घोडगंगा कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांनी सर्वांचा सत्कार करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबाजी रासकर यांनी तर आभार विजय थोरात यांनी मानले.