सुनील भंडारे पाटील
लोणीकंद (तालुका हवेली) येथे दुचाकी बुलेट गाडी व डंपरच्या झालेल्या भीषण अपघातात एक जणांचा जागीच मृत्यू झाला,
कु, सौरभ सतीश साबळे (वय 20 वर्ष) राहणार कोरेगाव भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे, याबाबतीत पेरणे पोलीस चौकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणीकंद गावांमधील पुणे नगर हायवे माथ्यावर सुबिरबीय गेटच्या समोर रॉंग साईडने येणाऱ्या डंपरला वाघोली कडून लोणीकंद कडे येणाऱ्या बुलेट गाडीची जोरदार धडक बसल्याने, बुलेट चालवणारा सौरभ साबळे गंभीर जखमी झाला, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पेरणे पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास पाटील यांनी दिली, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत तपास व गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे,
पुणे नगर महामार्गावर संबंधित ठिकाणी खडी क्रशर चे डंपर सतत ये जा करतात, चालकांना कुठल्याही प्रकारची शिस्त नाही, बेजबाबदार पणे नियम तोडून डंपर डायरेक्ट महामार्गावरील वाहनाचा विचार न करता रस्त्यावर आडवे तिडवे घुसतात, या ठिकाणी अनेक मृत्यू झालेत, त्यामुळे हा स्पॉट, अपघाताचा व मृत्यूचा सापळा बनला आहे, तातडीने या ठिकाणी उपाय योजना करण्याची गरज आहे,