शिरूर तालुका प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील जांबुत येथील जय हनुमान महिला मंडळ नवरात्रौत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे नियोजन सर्व महिलांनी केले होते. होम मिनिस्टर,महाभोंडला,देवीचे गाणी स्पर्धा, लहान मुलांच्या डान्स स्पर्धा, तसेच फणी गेम्स,संगीत खुर्ची इत्यादी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आदर्श शिक्षक संतोष रणसिंग,आदर्श शिक्षिका सौ मेघा रणसिंग व बाळु पवार यांच्या वतीने परिसरातील देवदर्शनाची मोफत सोय करण्यात आली होती.
या मंडळाच्या वतीने रोज संध्याकाळी फराळ वाटपाचे नियोजन होते.या मंडळाला घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे,पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे,टाकळी हाजीचे सरपंच अरुणा घोडे,संसद आदर्श ग्रामपंचायत जांबुतचे सरपंच दत्तात्रय जोरी, उपसरपंच राणी बोऱ्हाडे,ग्रामपंचायत सदस्य,जयमल्हार हायस्कूल चे मुख्याध्यापक सतिष फिरोदिया, विविध कार्यकारी सोसायटी संचालक यांनी भेटी देऊन मंडळाचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय हनुमान महिला मंडळाच्या सर्व महिलांनी तसेच जय हनुमान गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.माजी सरपंच बाळुशेठ फिरोदिया,उपाध्यक्ष रमेश राऊत,खजिनदार आदर्श शिक्षक संतोष रणसिंग,कार्याध्यक्ष स्वप्नील चव्हाण,सचिव संतोष राऊत अशोक गाडेकर, राजु लुनिया,गणेश कदम,नितीन माने,राजू कदम,संदीप थोरात,रावसाहेब रणसिंग, सोमनाथ रणसिंग, सुचित राऊत, स्वस्तीक राऊत,शंकर राऊत,गौरव मुंडलिक,नंदू राऊत,गुरु राऊत, सुमित जाधव, सुमित मुंडलिक, ओंकार राऊत,अमोल चव्हाण, , बाळु पवार नाना पवार,निलेश राऊत, गणेश राऊत,मंगेश शहा,राहुल मुंडलिक, विनायक राऊत, बंटी राऊत,आयुष राऊत यांनी मार्गदर्शन केले.