विजयस्तंभ नगर रहिवाशांच्या उपोषणाच्या निवेदनाने प्रशासन हादरले, उपोषण मागे घेण्याची विनंती

Bharari News
0

सुनील भंडारे पाटील

            विजयस्तंभ नगर पेरणे फाटा (तालुका हवेली) येथील रहिवाशांनी राहत असलेल्या घराची व पत्राशेडची ग्रामपंचायत सरकारी दप्तरी 8 अ ला नोंद होण्यासाठी आज शुक्रवार दि 7 रोजी लाक्षणिक उपोषणाचे रणशिंग फुंकले होते, याची शासकीय स्तरावर विचारणा करून समझोत्याचा मार्ग काढून उपोषण थांबवण्यात आले,         
पेर
णे फाटा येथील पुणे नगर महामार्गालगत विजयस्तंभ नगर या झोपडपट्टी मधील गेले 30 ते 40 वर्ष राहत असणारे रहिवाशी यांची अनेक वर्षापासून ची प्रलंबित असलेल्या मागणीसाठी अनेक वर्षापासून संघर्ष चालू आहे, संबंधित घरांची व पत्रा शेडची सरकारी दप्तरी नोंद नसल्याने शासनाच्या अनेक सोयी सुविधांपासून, योजनांपासून येथील जनतेला अलिप्त राहावे लागते, रहिवाशांची होणारी गैरसोय थांबावी यासाठी त्यांनी ग्रामपंचायत व वरिष्ठ कार्यालयाकडे वारंवार 8 अ ला नोंद करण्याची मागणी केली आहे, घरांच्या नोंदीचा तातडीने विचार करावा यासाठी विजयस्तंभनगर या झोपडपट्टीतील नागरिकांनी आता उपोषणाचे शस्त्र उपसले होते, या संदर्भात जिल्हाधिकारी पुणे, तहसीलदार हवेली, आमदार शिरूर हवेली, पोलीस स्टेशन लोणीकंद, ग्रामपंचायत पेरणे, प्रसार माध्यमांना निवेदन दिले होते,                 
विजयस्तंभ नगर झोपडपट्टी मधील रहिवाशांच्या उपोषणाच्या इशाऱ्याने प्रशासनाला खडबडून जाग आली, तातडीने हालचाली होत, संबंधित अधिकाऱ्यांनी संपर्क साधत उपोषण थांबवण्यासाठी मार्ग काढला, संबंधित नोंदी बाबत गावांमधील नामदेव जयवंत वाघमारे व इतर यांनी सदर झोपडपट्टीतील मिळकतीबाबत मालकी असल्याचा दावा गटविकास अधिकारी यांचे समोर सुनावणी चालू आहे, अंतिम सुनावणी नंतर आदेश आणि नोंदी बाबत कारवाई करण्यात येईल तरी वरिष्ठ कार्यालयाचा आदेश येईपर्यंत आपण उपोषण मागे घ्यावे  अशी विनंती करण्यात आल्याने उपोषणाच्या पावित्र्यात असणाऱ्या नागरिकांनी तूर्त उपोषण थांबवले, उपोषण थांबवण्याचे विनंती चे पत्र संबंधित अधिकाऱ्यांच्या वतीने ग्राम विकास अधिकारी कानिफनाथ थोरात, सरपंच रुपेश बापू ठोंबरे यांनी दिले,
        सदर बाबतीत निर्णय घेताना सामाजिक व स्तंभाच्या परिसरामध्ये कुठली अनुचित घटना उपोषणाच्या अडून इतर सामाजिक घटकांनी करू नये त्याचप्रमाणे ग्रामपंचायत व पंचायत समिती हवेली गटविकास अधिकारी यांचे कडून नाव नोंदी बाबत सकारात्मक भूमिका घेत असल्याचे आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरात लवकर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे सदर उपोषण तात्पुरत्या काळासाठी आज रोजी स्थगित करण्यात आलेले आहे प्रशांत शिर्के  गटविकास अधिकारी पंचायत समिती हवेली  ,गजानन पवार लोणीकंद पोलीस निरीक्षक ,रुपेश बापू ठोंबरे सरपंच ग्रामपंचायत पेरणे , कानिफनाथ थोरात ग्रामविकासअधिकारी, सदर अधिकाऱ्यांच्या समन्वयांमुळे  उपोषण तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्यात आले
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!