रांजणगाव येथे स्व.धर्मराज करपे गुरुजी स्मृती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

Bharari News
0
रांजणगाव येथे स्व.धर्मराज करपे गुरुजी स्मृती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न 
श्री. सखाराम तुळशीराम फंड यांना जीवन गौरव पुरस्कार , 
श्री.संभाजीराजे गोरडे यांना आदर्श पञकार ,तर  ज्ञानेश शिवाजी पवार यांना ऊत्कृष्ठ निवेदक म्हणुन पुरस्कार देण्यात आले आहेत.

रांजणगाव गणपती संभाजी गोरडे 
        समाज घडवण्यासाठी शिक्षकांनी केलेला  त्याग मोलाचा असल्याचे प्रतिपादन रांजणगाव देवस्थानचे माजी विश्वस्त प्रा. नारायण पाचुंदकर-पाटील रांजणगाव येथे केले. 
रांजणगाव गणपती ता. शिरुर येथे 
महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा,शाखा- शिरुर संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वर्गीय धर्मराज कर्पे गुरुजी स्मृती पुरस्कार २०२२ या सोहळ्यास मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 
रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरातील सभागृहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेचे विभागीय अध्यक्ष सोपानराव सिताराम धुमाळ ( आबा)  हे होते. 
या प्रसंगी राज्य सरचिटणीस अनिल पलांडे , कार्याध्यक्ष शहाजी पवार , महिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया नवले ,  पतसंस्थेचे चेअरमन म्हतारबा बारहाते , उपाध्यक्ष अंजली शिंदे , श्वेता कर्पे , तालुकाध्यक्ष प्रकाश नरवडे , राजेंद्र चोरे , सुर्यकांत डफळ व  विविध संस्थाचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     प्राथमिक शिक्षकांचे पंचप्राण असलेल्या स्वर्गीय धर्मराज करपे गुरुजींच्या स्मृती जपणे, गुणवंत शिक्षकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे, आदर्श शाळांचा गौरव करणे हा या कार्यक्रमामागील उद्देश.आहे. 
     करपे गुरुजींनी प्राथमिक शिक्षकांसाठी केलेल्या कार्यातून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.
  आपल्या लोकांनी, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये, आपल्या गुणवंत लोकांचा सन्मान करणे, हा खऱ्या अर्थाने त्यांनी केलेल्या कार्याची पावती असते.
     तसं पाहिलं तर शिरूर तालुक्यातील सर्वच शिक्षक तळमळीने कार्य करत आहेत. पुरस्कारासाठी निवडलेले गुरुजन या गुरुजनांचे प्रतिनिधी आहेत.
        पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे
            जीवन गौरव पुरस्कार
        श्री. सखाराम तुळशीराम फंड
             आदर्श शिक्षक पुरस्कार
  श्री. अरुण धोंडीबा दुर्गे ,श्री.सुदाम रघुनाथ खैरे श्रीम.जयश्री शिवाजी
           धुमाळ , श्री.बाळू लहू इचके ,  सौ.शैलजा सुरेश ननावरे,  श्री.अशोक सहादू गट   सौ.प्रतिभा अशोक आहेर    श्री. राहुल विठ्ठल उकिरडे   श्री. दत्तात्रेय दगडू आखोटे
    सौ. सारिका उद्धव रोकडे   श्री. जीवन वीरकुमार
               हिरवे     श्री. तुकाराम चांगदेव
            भोसले      श्री. अशोक छबू बुलाखे
      श्री.सुभाष महादेव बांदल
     श्री. भरत लक्ष्मण
           घायतडक
    श्री.उमेश शिवाजी उदम सौ. स्वाती सुरेश होले श्री. संदीप कारभारी गिते  श्री.अशोक विष्णू चोले  
  श्रीमती रेखा दिलीपराव
     पिसाळ ,.अर्जुन ज्ञानेश्वर गांजे ,सौ.लता तुकाराम पुंडे ,श्री.संतोष जनार्दन
     गायकवाड ,श्री.मनोज  म्हाळसकर ,सौ.कविता विठ्ठल
       जवळकर, सौ.शशिकला गंगाराम थोरात
  , सौ.सुनंदा गणेश धुमाळ
                 * पत्रकार*
 श्री.संभाजी गोरडे , श्री.सिकंदर तांबोळी
                  *निवेदन*
 ज्ञानेश शिवाजी पवार
   *आदर्श शिष्यवृत्ती*
        *मार्गदर्शक*
 सौ.सीमा भूमेश गवारी 
*आदर्श नवोदय मार्गदर्शक* 
  सौ. रत्नप्रभा प्रफुल्ल कामठे 
*आदर्श शाळा इयत्ता १ ते ४* 
जि. प. प्राथमिक शाळा ,   
        सुक्रेवाडी 
*आदर्श शाळा १ ते ७* 
 जि. प. प्राथमिक शाळा ,
       सोनेसांगवी
असे पुरस्कार देण्यात आले. 
प्रास्तविक रामचंद्र नवले सुञसंचलन शहाजी पवार तर आभार   भाऊसाहेब दुर्गे यांनी व्यक्त केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!