संदीप गिते यांना स्व. धर्मराज कर्पे गुरुजी स्मृती पुरस्कार, वाबळेवाडी शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Bharari News
0
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले 
          वाबळेवाडी (तालुका शिरूर) शाळेतील उपक्रमशील व शिष्यवृत्ती तज्ञ शिक्षक संदीप गिते यांना स्व. धर्मराज कर्पे गुरुजी स्मृती पुरस्कार महागणपती मंदिर, रांजणगाव येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेचे विभागीय अध्यक्ष सोपानराव धुमाळ यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.         
वाबळेवाडी शाळेतील उपक्रमशील व शिष्यवृत्ती तज्ञ शिक्षक संदीप गिते यांना स्व. धर्मराज कर्पे गुरुजी स्मृती पुरस्कार महागणपती मंदिर, रांजणगाव येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेचे विभागीय अध्यक्ष सोपानराव धुमाळ यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. याप्रसंगी  राज्य सरचिटणीस अनिल पलांडे, कार्याध्यक्ष शहाजी पवार, महिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया नवले, पतसंस्थेचे चेअरमन म्हातारबा बारहाते, उपाध्यक्ष अंजली शिंदे, श्वेता कर्पे, राजेंद्र चोरे सूर्यकांत डफळ, तालुका अध्यक्ष प्रकाश नरवडे ,सरचिटणीस आप्पासाहेब जगदाळे, कोषाध्यक्ष महेश इंगळे, माजी अध्यक्ष रामचंद्र नवले आणि महिला आघाडी अध्यक्षा सविता भोगावडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.   
वाबळेवाडी शाळेत संदीप गिते गुरुजींना स्व. धर्मराज कर्पे गुरुजी स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे सजल्यानंतर विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी शाळेतील मुख्याध्यापकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. वाबळेवाडी शाळेतील उपक्रमशील व शिष्यवृत्ती तज्ञ शिक्षक म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे. त्यांना पुरस्कार प्रदान होताच शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
             स्व. धर्मराज कर्पे गुरुजी स्मृती पुरस्कार म्हणजे एक प्रकारे शैक्षणिक जबाबदारी स्वीकारणे. येथून पुढील काळात विद्यार्थी आणि शाळेसाठी अशाच प्रकारचे काम करून शाळेच्या गुणवत्ता विकास वाढीसाठी प्रयत्न करीन. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे ध्येय समोर ठेवून आपल्या सर्वांच्या सहकार्याने शाळा प्रगतीपथावर नेण्याचे काम करत राहील, असे मत यावेळी सत्कारमूर्ती संदीप गिते यांनी व्यक्त केले.
                 याप्रसंगी स्वर्गीय धर्मराज करपे गुरुजी स्मृती पुरस्कार कार्यक्रमाचे संयोजन केल्याबद्दल राज्य सरचिटणीस अनिल पलांडे, कार्याध्यक्ष शहाजी पवार, महिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया नवले, पतसंस्थेचे चेअरमन म्हातारबा बारहाते, उपाध्यक्ष अंजली शिंदे, श्वेता कर्पे, राजेंद्र चोरे सूर्यकांत डफळ, तालुका अध्यक्ष प्रकाश नरवडे ,सरचिटणीस आप्पासाहेब जगदाळे, कोषाध्यक्ष महेश इंगळे, माजी अध्यक्ष रामचंद्र नवले आणि महिला आघाडी अध्यक्षा सविता भोगावडे सर्व  सहकाऱ्यांचे ,संघटनेच्या उपस्थित  सर्व  सभासदांचे यावेळी संयोजकांकडून आभार मानण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!