उरुळी कांचन प्रतिनिधी नितीन करडे
लोणी काळभोर (तालुका हवेली) येथील स्टेशन चौकामध्ये धोकादायक सिग्नल, मोठ्या अपघाताची शक्यता, संबंधित खाते व प्रशासनाचे दुर्लक्ष, अशा आशयाची बातमी भरारी ने आज सकाळी प्रसिद्ध केली होती, या वृत्ताच्या दणक्याने, पोलीस व प्रशासनाला जाग आली, तातडीने सिग्नल हटवला,
आज सकाळी लोणी काळभोर येथील स्टेशन चौकातील नुकताच बसवण्यात आलेला सिग्नल, चालू होण्याअगोदरच वाकडा झाला होता, एका बाजूला रस्त्यात झुकला होता ही बाब भरारी च्या लक्षात आल्यानंतर, संभाव्य धोका थांबवण्यासाठी छायाचित्रासहित बातमी तातडीने प्रसिद्ध करण्यात आली, झोपलेल्या पोलीस व प्रशासनाला या वृत्ताने खडबडून जाग आली, सकाळी प्रसिद्ध झालेले वृत्ताची दखल घेत दुपारपर्यंत धोकादायक सिग्नल त्या जागेवरून हटविण्यात आला, काढण्यात आला, त्यामुळे संभाव्य धोका टळला, त्याबद्दल लोणी काळभोर, कवडीपाट, येथील नागरिक व प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला, लोकांनी पोलीस, प्रशासन, भरारी न्युज चे आभार मानले,
आत्ताच्या अपडेट नुसार सिग्नल दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे