ज्ञानेश्वर मिडगुले -सणसवाडी
कान्हूर मेसाई (ता .शिरूर) येथील भोकनळ वस्तीवरील प्रतिक व आकाश दत्तात्रय भोकनळ बंधूनी सोडाशॉप , जनरल स्टोअर बरोबर सलून व्यवसायातही भरारी घेतली ,हे मराठी माणसाचे पुढचे पाऊल असून कोणताही व्यवसाय जिद्दीने केल्यास यश मिळते , असा विश्वास माजी उपसरपंच दिपक तळोले यांनी वृंदावन केशकर्तनालयाचे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला माजी सरपंच बंडू पुंडे , शिवसेना उपतालुका प्रमुख शहाजी दळवी ,ग्रा. सदस्य विजय घोलप आदीमान्यवरांचे हस्ते उदघाटन करणेत आले . यावेळी ग्रा. सदस्य बाबा पुंडे , आबा पुंडे ,मा तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष गावडे , विद्याधामचे सचिव सुदाम तळोले , सदस्य शहाजी दळवी , निलेश ननवरे, प्रविण बांदल , कुमार भोकनळ, नितीन घोलप , सुहास भोकनळ, तात्या भाऊ ढगे, सचिन टाव्हरे , नवनाथ जिते, बबन नाना पुंडे व युवा कार्यकर्ते उपस्थीत होते .
राजगुरुनगर शिरूर रोडलगत कान्हूर मेसाईचा घाट चढताच माथ्यावर सुरुवातीला माथेरान हॉटेल झाले . त्यानंतर याशेजारी माथ्यावर पुंडे व इतरांची ४ हॉटेल व शेजारी पेट्रोल पंप झालेने या माथ्याला मार्केटच आल्याने आकाश भोकनळने सुरु केलेल्या या वृंदावनला शहाजी दळवी यांनी शुभेच्छा देत चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली .