आंबेगाव प्रतिनिधी प्रमिला टेमगिरे
. लोकनियुक्त सरपंच जे.डी.टेमगिरे यांच्या अध्यक्षतेखाली महिला ग्राम सभा व बालक सभा पार पडली. शासकीय नियमानुसार लोकनियुक्त सरपंच जे. डी. टेमगिरे यांच्या अध्यक्षतेखाली महिला ग्राम सभा पार पडली. थोरांदळे ग्रामपंचायत ही आंबेगाव तालुक्यात बिनविरोध निवडून आलेल्या पैकी पहिल्या क्रमांकावर असलेली ग्रामपंचायत असून त्यांच्या ग्रामपंचायतीच्या कार्यकालातील काम सुरू असतानाची पहिलीच महिला ग्रामसभा व बालक सभा आज खूप चांगल्या पद्धतीने पार पडली . महिला ग्रामसभेत शासकीय नियमांचे पालन करून महिलांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचे वाचन करून त्या योजनेस पात्र महिलांचे अर्ज भरण्यासाठी नावांची यादी तयार करण्यात आली. व गावातील काही अत्यावशक सुविधांची महिलांनी मागणी केली असता ग्रामसेवक व सरपंच यांनी आढावा पत्रक तयार करून सर्व महिलांची मागणी व कामे मार्गी लागतील असे आश्वासन दिले .तसेच बालक सभा घेतली असता लहान मुलंच्या शालेय शिक्षणाच्या बाबतीत विचारपूस करून गरीब मुलांच्या शिक्षणाचा संदर्भात बातचीत झाली व बालविवाह प्रतिबंधक कायदा या बद्दल माहिती व अधिकार या विषयावर माहिती देण्यात आली.
यावेळी थोरांदळे ग्रामपंचायत सदस्य नितीन फुटाणे, विक्रम टेमगिरे, महिला सदस्य,चंद्रकला बारवकर, अलका विश्वासराव .मनीषा मिंडे,यमुना टेमगिरे, रोहिणी टेमगिरे गावचे पोलीस पाटील वैशाली टेमगिरे, पुणे जिल्हा पंचायत महिला फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षा नीलम टेमगिरे,.अखिल भारतीय ग्राहक पंचायत महिला अध्यक्षा प्रमिला टेमगिरे उपस्थित होत्या. अंगणवाडी सेविका , मदतनीस व आशा परिचारिका व गावातील बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंचांनी केले तर आभार जि.प.प्रा.शाळेच्या थोरात मॅडम यांनी मानले.