घोडगंगा साखर कारखान्याची रणधुमाळी - कार्यकर्त्यांचा लागणार कस

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
              शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांची धडकन, हृदय असणारा घोडगंगा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकांची रणधुमाळी मुळे वातावरण तापले असून, समोरासमोर उभ्या असणाऱ्या दोन पॅनल मध्ये अटीतटीची लढाई होणार आहे,     
गेल्या पंचवीस वर्षापासून शिरूर तालुक्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या या कारखान्याची निवडणूक येत्या सहा तारखेला मतदान होणार आहे, 21 संचालक संख्या असणाऱ्या या संचालकांचे भव्यतव्य सुमारे 18000 सभासद मतपेटीत बंद करणार आहेत, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेल, भाजपा पुरस्कृत किसान क्रांती पॅनेल, समोरासमोर अटीतटीची लढाई होणार आहे, 21 जागांपैकी 1 जागा ऋषिराज पवार बिनविरोध झाली आहे, राहिलेल्या 20 जागेसाठी निवडणूक लढवून आम्हीच निवडणूक जिंकणार असा दावा भाजपा पुरस्कृत किसान क्रांती पॅनलने केला आहे, तर गेले पंचवीस वर्षे सत्ता असणाऱ्या शिरूर  हवेलीचे आमदार अशोक बापू पवार यांचा विजय असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे,          
अगदी जवळ येऊन ठेपलेल्या या निवडणुकी साठी दोन्ही पॅनेलने कंबर कसली असून प्रचार सभांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप याला उधान आले आहे, कारखान्याच्या कारकिर्दीत गेले पंचवीस वर्ष सत्याधार्‍यांनी काय केले याबाबतीत विरोधक आक्रमक झालेले आहेत, तर सत्ताधारी केलेल्या आरोपांना पाणी पाजत आहेत,या निवडणुकीत खूप मोठी आर्थिक उलाढाल होण्याची ही शक्यता असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे, एकंदरीत समोरासमोर उभे असलेल्या दोन्ही पॅनलच्या प्रमुखांची व कार्यकर्त्यांची चांगलाच कस निघणार आहे, विजयाचा ध्वज कोण फडकवतं हे आता आगामी काळच सांगेल,
        राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेल मधून आमदार अशोक बापू पवार, सुजाता भाभी पवार, राजेंद्र नरवडे, पंडित आप्पा दरेकर, मोनिकाताई हरगुडे, प्रकाश पवार,
         तर भाजपा पुरस्कृत किसान क्रांती पॅनेल मधून दादा पाटील फराटे, कैलास सोनवणे, भगवानराव शेळके, अमित सोनवणे, बाबासाहेब दरेकर, प्रकाश गव्हाणे यांचा खरा कस या निवडणूक मध्ये लागणार आहे,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!