सुनील भंडारे पाटील
पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर (तालुका हवेली) येथील स्टेशन चौकातील वाहतूक सिग्नल रस्त्यात धोकादायक वाकलेला असून मोठ्या अपघाताची शक्यता, संबंधित खात्याचे दुर्लक्ष,
पुणे सोलापूर महामार्गावर अशा काही चुकीच्या गोष्टींमुळे लहान मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे, वाहतुकीमध्ये अडथळे, त्याचप्रमाणे वाहकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, तसेच संबंधित खात्याचे दुर्लक्ष यामुळे भयंकर अपघातांना लोणी काळभोर, कवडीपाट नागरिकांना सामोरे जावे लागले आहे, अत्यंत लोकवर्दळीने गजबजलेला लोणी काळभोर स्टेशन चौक या ठिकाणी नागरिकांच्या निदर्शनास येणारा लोणी काळभोर स्टेशन चौक, या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी बसवलेला सिग्नल चालू होण्या अगोदरच रस्त्यात एक बाजूला झुकलेला आहे कमी उंचीचे वाहने वगळता, जास्त उंचीची वाहने, कंटेनर्स, येथून कशी पास होणार हे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, या झुकलेल्या सिग्नल पासून लहान मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे, हे वाहतूक नियंत्रण कक्षाच्या लक्षात येत नाही का,? किंवा एखादा मोठा अपघात झाल्यानंतर दुरुस्ती होईल का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे, संबंधित खात्याने तातडीने हा सिग्नल दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे,