सुनील भंडारे पाटील
चार हजारांची लाच घेताना तहसीलदार कार्यालय दौंड येथील महसूल विभागातील महसूल सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्र यांच्या पथकाने रंगेहात पकडला,
याबाबतीत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 अन्वये, दौंड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर 505 / 2022 असा गुन्हा दाखल करण्यात आला असून, लाचखोर महसूल सहाय्यक वर्ग 3, लोकसेवक तुषार वसंतराव शिंदे वय 32 वर्ष याला ताब्यात घेण्यात आले आहे, या घटनेत तक्रारदार यांची पुनर्वशीत वाटप झालेल्या शेत जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील भोगवटा वर्ग 2 हा शेरा कमी करून भोगवटा वर्ग 1 या शेऱ्याची अंमलबजावणी करण्याकरिता सातबारा वरील ऑनलाइन ब्लॉक काढून देण्यासाठी शिंदे यानी पाच हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे आली होती, लाच मागितल्याची शहानिशा करून, अँटीकरप्शन पुणे यांच्यावतीने सापळा रचण्यात आला, सदर तक्रारीची पडताळणी केली असता, शिंदे याने तक्रारदाराकडे 5000 रुपयांची मागणी करून, तडजोडीअंती 4000 रुपये लाच रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी रंगेहात पकडले, पुढील तपास ला प्र वी पुणे युनिटच्या पोलीस उपअधीक्षक शितल घोगरे करत आहेत,
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या पथकाने केली