सासवड प्रतिनिधी बापू मुळीक
कचरा साफ करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सासवड नगरपालिकेला दिले निवेदन अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन : सिद्धार्थ पवार- उपाध्यक्ष पुरंदर तालुका मनसे सासवड आंबोडी रोड स्वामी समर्थ सोसायटीच्या जवळ सहारा पर्ल बिल्डिंगच्या मागील बाजूस प्रचंड प्रमाणात कचऱ्याचे प्रमाण वाढलेले आहे,कचऱ्याचा अगदी उच्छाद झालेला आहे,त्यामुळे येथील सामान्य जनजीवनावर आरोग्य विषयी धोका निर्माण झालेला आहे,
तसेच संबंधित ठिकाणच्या बाजूनेच शाळकरी मुले, कॉलेज विद्यार्थी, तसेच जेष्ठ नागरिक जात असतात,या कचऱ्याचा घाणेरडा वास त्या परिसरात प्रचंड प्रमाणात वाढत चाललेला आहे तसेच शेजारी मोकळे पटांगण आहे जेथे जेष्ठ नागरिक संध्याकाळी जेवन झाल्यानंतर व सकाळच्या वेळी मॉनिग वॉकला येत असतात, तर त्यांच्या सुद्धा आरोग्याला याविषयी खूप धोका निर्माण होऊ शकतो,