सुनील भंडारे पाटील
लोणीकंद (तालुका हवेली) पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते पोलीस शौर्य पदक ने नुकतेच सन्मानित करण्यात आले,
सन 2020 आणि 2021 या वर्षात जाहीर झालेले पोलीस शौर्यपदक व पोलीस खात्यातील उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्ता पूर्वक सेवेसाठी पोलीस पदक प्रदान समारंभ मुंबई येथील राजभवनातील दरबार हॉल येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित संपन्न झाला, राज्यातील पोलीस खात्यातील सुमारे 114 पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले,
पुणे शहर आयुक्तालय अंतर्गत हवेली तालुक्यातील लोणीकंद पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले गजानन पवार यांना राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते पोलीस शौर्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले, याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश शेठ, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, त्याचप्रमाणे इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या या सन्मानाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद, गजानन पवार यांनी सांगितले की, जनतेची सेवा करत असताना आम्हाला आमच्या कार्याचा अभिमान वाटतो, वर्दीवर असताना कायदा व सुरक्षा आबाधित ठेवणे आणि जनतेच्या सुरक्षेची काळजी घेणे हेच आमचे एकमेव धोरण व कर्तव्य असते, या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणाने काम केल्याची ही पोचपावती,