खळबळ जनक - पेरणे येथे पुराच्या पाण्यात एकाचा मृत्यू, जीव वाचवण्यात ग्रामस्थांना अपयश, ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
             काल रात्रीपासून चाललेल्या अतिवृष्टी, ढगफुटी पावसामुळे पेरणे (तालुका हवेली) येथे पुराच्या पाण्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे,            
सद्यस्थितीत पुणे जिल्ह्याच्या सर्वच ठिकाणी परतीच्या वळवाच्या पावसाने थैमान मांडले असून ओढ़े नाले तुडुंब भरून वाहत आहेत, रस्त्याला आडवे वाहणारे ओढ्यांना मोठा पूर आल्याने रस्ते बंद होत आहेत, रात्रभर झालेल्या जोरदार पावसाने, पेरणे येथील पोल फॅक्टरी समोर काळ्या  ओढ्याला मोठा पूर आल्याने, रस्ता ओलांडणे मुश्किल झाले होते, अशात ओढ्या शेजारील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यातील पुराच्या पाण्यात सायकलवर असणाऱ्या गणेश ( एवढेच नाव मिळाले आहे ) ह्या व्यक्तीचा पाण्यात तोल गेला, व तो पाण्यात पडला, ही घटना डोळ्यासमोर पाहिल्यानंतर तातडीने सरपंच रुपेश (बापू) ठोंबरे, रवींद्र वाळके, किरण वाळके, मंगेश वाळके, व इतर यांनी तातडीने धाव घेऊन पुराच्या पाण्यात पडलेल्या व्यक्तीला वाचवण्याचा धाडसी  प्रयत्न केला परंतु पाण्याची खोली जास्त असल्याने, या व्यक्तीला वाचवण्यात अपयश आले,
घटनास्थळी पेरणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास पाटील यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय  तपासासाठी ससून हॉस्पिटल पुणे येथे पाठवण्यात आला, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीचे गणेश (वय अंदाजे 45) एवढेच नाव मिळाले असून त्याच्या संबंधित कोणीच नाही, तो व्यक्ती बंगाली आहे,पेरणे फाटा आसपासच्या गावात भंगार गोळा करण्याचा व्यवसाय ही व्यक्ती करत होती,  
या घटनेची माहिती मिळताच पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी तातडीने ग्रामस्थ व पेरणे गावचे सरपंच रुपेश (बापू) ठोंबरे यांच्याशी संपर्क साधला, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी उद्या तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, आणि पोलीस स्टेशन लोणीकंद अधिकारी यांची तातडीने बैठक बोलावली आहे, तसेच तातडीने या ठिकाणच्या अडचणीवर मार्ग काढू असे सांगितले,
पुणे नगर महामार्गापासून पेरणे फाटा मार्गे पुढे पेरणे,डोंगरगाव, बुरकेगाव, पिंपरी सांडस, नाव्ही सांडस, या गावांमध्ये संबंधित रस्त्यावर अतिरिक्त पावसाने कायम पूर येतात, वाईट घटना घडू नये म्हणून या रस्त्याचे काम, ठिकठिकाणी पुलाचे काम होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाशी अनेकदा लेखी स्वरुपात निवेदन देऊन देखील विचार केला जात नाही, प्रशासन अजून किती घटना पाहणार आहे, संबंधित रस्त्याचे काम झाले नाही तर उपोषण आंदोलन, व तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे,
सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता जानवी रोडे यांनी सांगितले की, घटनास्थळाची तातडीने पाहणी करून, काम मार्गी लावू, शिवाय मृत व्यक्तीच्या वारसांसाठी मदत देण्याचा प्रयत्न करू,     
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!