सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
कान्हूर मेसाई (ता .शिरूर) येथे रात्री खर्डे लवण व ढगेवाडी शेजारील तलाव फुटल्याने खालील शेते व कान्हूर मेसाई गावात पाणी घुसून शेतकरी व्यापारी व नागरीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कृषी महसूल शासन यंत्रनेकडून पहाणी पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी ,अशी मागणी सरपंच चंद्रभागा विठ्ठल खर्डे व ग्रामस्थांनी केली आहे .
यावर्षी अतिवृष्टीमुळे आधीच शेतात पाणी साचून अर्ध्यावर पिके वाया गेली . त्यात रात्री १० चे सुमारास ढगेवाडी भागात ढगफुटीगत जोराचा पाऊस होउन माजी सरपंच सुरेश खर्डे यांचे शेता जवळील तलाव फुटला असे नरवडे वस्तीवरून कळलेचे प्रगतीशील शेतकरी बाळासो घारे यांनी सांगीतले .आणि तो वरचा पाण्याचा लोंढा पुढे नरवडे व तळोले यांचे शेजारील तलावात येता तोही फुटून धोधो घोंघावत पाणी ओढ्याकडेच्या शेतांना खरडत कान्हूर मेसाई गावात घूसून मोठ्या प्रमाणात हानी झाली . येवढे सारे पाणी कुलकर्णी लोहार भंडलकर आळीत घुसून नागरीकांचे घरगुती सामान भिजले . काहींची घराबाहेर गोठ्यातील शेरडं कर्ड वाहून गेली . पुढे ओढ्याकडेच्या सलूनच्या दुकानाला भुई सपाट करत बाजूचे नन्नवरे ,वाघोले व शेजारच्या दुकानांनी पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . शेजारील मारुती मंदिराचा पाया या पुरामुळे उघडा पडल्याचे दिसले .इकडे लोकांनी आपले बांध वाढवत ओढे नाले लहान लहान बनवले ,त्यात साध्या पावसाचे पाणी बसत नाही तर एवढे दोन तलाव फुटल्या वर पाणी कसे बसणार, त्यामुळे ते मारुती मंदिरा शेजारील दुकानांत घुसत ननवरे यांचे दुकानाचे शटर तोडून आतील सारा माल भिजला . खास दिवाळीसाठी या दुकानदारांनी लाखोंचा किराणा भरून ठेवला होता, तो या अस्मानी संकटाने मातीत मिसळून गेला. तलाठी , सर्कल , ग्रामसेवक ,कृषी अधिकारी घटनास्थळी पहाणी करत असून ओढ्या कडेच्या विहीरी व तळोले खर्डे , बढे, घोलप आदी बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे .शिरूर आंबेगावचे नेते नामदार दिलीप वळसे पाटील हेही येवून लोकांची मदत करतील असा आशावाद माजी उपसरपंच दिपक तळोले यांनी व्यक्त केला .