सासवड प्रतिनिधी बापू मुळीक
पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहात जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने पार पडलेल्या जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण प्रसंगी जिल्हाध्यक्ष नंदकुमार सागर यांनि शिक्षक शिक्षकेत्तर भरती प्रक्रिया तातडीने करावी ,वेतनेतर अनुदान मिळावे जुनी पेंशन योजना सुरू करावी,शालार्थ आयडी व स्व मान्यता ऑनलाइन सुरू करावी आदी मागण्या मांडल्या,
सामाजिक बांधिलकीची जोपासना करायची असेल तर शिक्षणाला पर्याय नाही,शिक्षकच समाज घडवत असतो. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभाग अपर सचिव दीपक शेलार यांनी केले.भाषणकला प्रशिक्षक शशांक मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे ,महेंद्र गनफुलें, मधुकर नाईक,शांताराम व पोखरकर, आदिनाथ थोरात,सुधाकर जगदाळे, तुकाराम बेनके,कुंडलिक मेमाणे,रामदास शिंदे हनुमंत पवार,वसंतराव ताकवले ,तानाजी झेंडे,तुकाराम मुळीक,प्रल्हाद कारकर,प्रशांत बेंगळे,मधुकर जगताप, दिलीप पापळ,दत्तात्रय कदम,आदींसह पुरस्कर्ते, शिक्षणप्रेमी,व जिल्हा तालुका मुख्याध्यापक संघाचे व शिक्षक संघाचे सर्व अध्यक्ष,सचिव उपस्थित होते . गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांना ट्रॉफी,प्रशस्तीपत्र, व शाल देऊन गौरविण्यात आले.