श्री क्षेत्र पिसे येथे घटस्थापना

Bharari News
0
सासवड  :प्रतिनिधी :बापू मुळीक 
       श्री क्षेत्र पिसे (ता. पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या नवरात्रोत्सवातील घट बसविण्याचा कार्यक्रम पारंपरिक व धार्मिक विधीद्वारे करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्ट मानकरी, सालकरी, गुरव, दागीनदार, विश्वस्थ, उपवासकरी मंडळी उपस्थित होती.
कोविडनंतर प्रथमच नवरात्र उत्सव साजरा होत असल्यामुळे सर्व भाविक भक्तांसह नारळ विक्रेते, गुलाल विक्रेते तसेच मंदिराशेजारील हॉटेल व्यावसायिक व इतर छोटे मोठे व्यावसायिक आगामी काळात आपला व्यवसाय भरभराटीस येईल या आशेने आनंदित झालेले आहेत. उत्सवानिमित्त मंदिर स्वच्छता, पिण्याचे स्वच्छ पाणी, दर्शनबारी, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.  तसेच मंदिरात जादा कार्यरत करण्यात आल्याचे श्रीनाथ संयोजन कमिटीचे सदस्यांमार्फत नियोजन करण्यात आले होते. श्रीनाथ मंदिरात म्हस्कोबाच्या नवरात्रोत्सवाला शुभारंभ उत्सवात होणाऱ्या विधी परंपरेनुसार पार पाडण्यात येणार असल्याचे पाटील आनंदराव अप्पा मुळीक व गुरव विठ्ठल गिरीगोसावी यांनी सांगितले.यावेळी ७० समस्त ग्रामस्थ श्रीनाथ म्हस्कोबाच्या मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त उपस्थित होते.यावेळी माजी सरपंच गणेश मुळीक ,सरपंच रोहन मुळीक,उद्योगपती संतोष मुळीक,इंजिनिअर गणपत मुळीक,पत्रकार बापू मुळीक,माजी सरपंच दीपक मुळीक,माजी मुक्ज्ञाद्यापक बाळासो मुळीक,मुख्याद्यापक तुकाराम मुळीक,रमेश मुळीक,माजी उपसरपंच सोमनाथ मुळीक,संतोष सुरेश मुळीक,माजी उपसरपंच संदीप मुळीक ,नवनाथ मुळीक,नंदू कुटे,गणेश सांगळे,बशीर सय्यद,पोपट गुलाब,विजय इंगळे, ग्राम.स.वि.का.सो.चेअरमन ,संचालक,तंटामुक्ती अध्यक्ष,जेष्ठ नागरिक, युवक,बहुसंख्येने ग्रामस्थ यांच्या माध्यमातून लक्ष्मीमाता मंदिराचे सुद्धा घटस्थापना रात्री सात वाजता सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!