उरुळी कांचन प्रतिनिधी-नितीन करडे
भारताच्या नकाशावर छोटेसे उरुळी कांचन खेडे गावाची ओळख निर्माण करणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी उरुळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रम येथे तीन दिवस मुक्काम करून उरुळी कांचन गावाचे पूर्ण भारतात नाव लौकिक केले आहे.अशा गावातील निसर्ग उपचार आश्रमच्या पथम प्रवेश द्वार फलकावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाची दुरावस्था झाली आहे.
उरुळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रम स्थापित केल्या नंतर आश्रम येथे राष्ट्रपती पासून ते खासदार आमदार लोकनेते यांनी या स्मृतिस्थळात भेट देऊन उरळी कांचन गावाचे विस्तारीकरण केले आहे. पण महात्मा गांधी यांच्या नावाचा ट्रस्टींना विसर पडला कि काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्वरित फलक वरील नावाची नूतनीकरण करावे अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
22 मार्च १९४६ सन साली महात्मा गांधी उरुळी कांचन येथे आले होते,व महात्मा गांधी यांनीच निसर्ग उपचार आश्रमची स्थापन केली असून डाॅ. मणिभाई देसाई यांचा कर्म योग,बाळकोबा भावे यांचा भक्तीयोग, कृष्णचंद्रजी अग्रवाल यांचा ज्ञानयोग,असा त्री योग लाभाल्याने आश्रमची उभारणी सन १९४६ साली झाली आहे.याच आश्रममुळे उरुळी कांचन गावाला देशभरात प्रसिद्धी मिळाली आहे.
यापुर्वी निसर्गोपचार आश्रमला राष्ट्रपती अब्दुल कलाम तसेच मागील महिन्यापूर्वी आदिवासी विकास केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांनी आश्रमला भेट दिली होती.तसेच अनेक मंत्री, खासदार, आमदार ,लोकनेते सरकारी अधिकारी, लेफ्टनंट कमांडर,व चित्रपट सृष्टीतील दिग्गज निर्माते ,सिने कलावंत व मान्यवरांनी निसर्गोपचार आश्रम येथे भेट देत असताना निसर्गोपचार आश्रमच्या प्रथम दर्शनी प्रवेशद्वार फलकावरील संस्थापक पूज्य महात्मा गांधी या नावाची दुरावस्था झालेली आहे.