आळंदी प्रतिनिधी आरिफ भाई शेख
आळंदीत मोठ्या संख्येने उत्तर भारतीय बिहारी लोक रहिवासी आहेत., आळंदी ग्रामीण आणि शहरी भागात व्यवसाय करणाऱ्यांची संख्या ही बिहारी यूपी लोकांची आहे., आज इंद्रायणी नदी तिरी छटपूजा करण्यासाठी उत्तर भारतीय लोकांनी गर्दी केली होती, हिंदू धर्मामधील उत्तर भारतीयांचा महत्त्वाचा क्षण भरारी न्यूज ने कॅमेऱ्यात टिपला,
मोठ्या प्रमाणात आळंदी शहराची वाढलेली व्याप्ती आणि विविध व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झालेल्या आळंदीतील बिहारी उत्तर प्रदेश झारखंड नेपाळचे नागरिक आळंदीत व्यावसायिक माध्यमातून मोठी गुंतवणूक केल्याचे देखील दिसून येत आहे,छट पूजेच्या निमित्ताने आळंदीत इंद्रायणी तिरावर या नागरिकांची हजारोंच्या संख्येनं गर्दी होती, दोन्ही इंद्रायणी तट भरून गेले होते, परमपूज्य मारुती बाबा कुऱ्हेकर..,आळंदी नगरपालिकेचे नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे पाटील.., पिंपरी चिंचवड महानगरपालिका माजी महापौर नितीन आप्पा काळजे..,डॉ, हभप नारायण महाराज जाधव .., यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून पूजेचा प्रारंभ झाला.., सूर्यास्ताच्या वेळी दीपोत्सवाच्या प्रमाणे संपूर्ण इंद्रायणी नदी दीपाच्या तेजाने व्यापून गेली होती, पुरातन वेद पुराणातील माहितीनुसार सूर्य देवाची बहीण छठ मातेचे पूजन करून हे लोक आराधना करत असतात, त्याबरोबर सूर्याची ही उपासना करतात..,36 तासाचा कठीण निर्जला उपासनानंतर ही पूजा केली जाते,महाराष्ट्रात मकर संक्रातीला ज्याप्रमाणे सूर्यउपासना असते तशी कार्तिकी षस्टी ला सूर्य देव आणि सूर्य देवाच्या बहिण छट माता दोघांची पूजा करण्याची प्रथा आहे, महाभारतात दृत क्रीडेमध्ये पांडव सर्व संपत्ती हरल्यानंतर द्रौपदीने छटमातेची पूजा केली होती,आणि गत वैभव पुन्हा प्राप्त होणे साठी प्रार्थना केली, त्यात द्रौपदीची मनोकामना पूर्ण झाली होती, एक पुरातन कथेमध्ये खूप वर्षांनी राजा प्रियंवदा ने पुत्र प्राप्त झाला तोही मृत त्यावेळी राजा आत्मसंर्पण करणार असताना देवसेना देवी प्रकट झाली आणि तिने सूर्याची उपासना करायला सांगितली, तसेच छटपूजेची सुरुवात सूर्यपुत्र कर्ण याने केली. पाण्यात उभे राहून सूर्याला अर्ध दिल्याशिवाय दिवसाची सुरुवात कर्ण करत नसे.., अशा प्रथा परंपरेने व्यापलेली ही छटपूजा आहे ,
वारकरी संप्रदायाचे भूषण ह भ प मारुती बाबा कुरेकर आळंदीतील नगरसेवक प्रगतशील उद्योजक प्रकाश कुऱ्हाडे पाटील.., पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर नितीन आप्पा काळजे. माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल भाऊ देशमुख ..,यांच्या प्रमुख हस्ते आणि उपस्थितीने इंद्रायणी मातेची पूजा करून सूर्य आराधना पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आली आणि कार्यक्रम संपन्न झाला.