सुनील भंडारे पाटील
चाकण मेदनकरवाडी (तालुका खेड) येथील ग्रामसेवक 5000 ची लाच घेताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी रंगे हात पकडला,
याबाबतीत चाकण पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला असून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 नुसार लोकसेवक, ग्रामसेवक राजाराम दामू रणपिसे वय 55 वर्ष या लाचखोर ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या वतीने सापळा रचून तक्रारदादाची पडताळणी करून, तक्रारदार याचे वडिलांनी खरेदी केलेल्या सदनिकेची नोंद घेण्यासाठी व घरपट्टी जमा करून घेण्यासाठी आरोपी राजाराम रणपिसे याने पाच हजारांची लाच मागणी केल्याची तक्रार ला प्र वी पुणे यांना प्राप्त झाली, सदर तक्रारीची पडताळणी केली असता आरोपी रणपिसे यानी, तक्रारदार यांच्याकडे 5000 रुपये लाच मागितली व स्वीकारल्यावर त्यास रंगे हात लाचलुचपत प्रतिबंध विभाग पुणे पथकाने पकडले, त्याच्यावर चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करत आहेत,
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त / पोलीस अधीक्षक ला प्र वी पुणे राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, यांचे मार्गदर्शनाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या पथकाने केला