शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
मुलींनो सायबर फसवणूक व सायबर गुन्ह्यापासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस कॉन्स्टेबल व समुपदेशक आहेरकर यांनी केले,
वढु बुद्रुक (ता.शिरुर) येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयात निर्भया पथकांतर्गत समुपदेशक आहेरकर मॅडम बोलत होत्या. याप्रसंगी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की आत्ताची तरुण पिढी मोबाईलच्या आहारी चाललेली आहे. मोबाईल मध्ये नवनवीन आलेले ॲप्स त्यामध्ये फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडियावरती जास्त आहारी गेलेले आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सायबर फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ॲप्समध्ये मुला-मुलींनी लक्ष घालू नये व आपले आनंदी जीवन हे जास्त आनंदी कसे होईल यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येकाने विद्यार्थी जीवनात अभ्यास शिस्त याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु आजची तरुण पिढी वाईट वर्तनाकडे झुकलेली आहे. वेळीच त्यामध्ये सुधारणा होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलीस कॉन्स्टेबल तावरे मॅडम यांनी सुद्धा मुलींच्या अनेक प्रश्नांना योग्य उत्तरे दिली व मुलींच्या मनातील अनेक शंका समस्यांचे समाधान केले. या कार्यक्रमास निर्भया पथकाच्या मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण, ज्येष्ठ शिक्षक विलास कुरकुटे, शिंदे सर, मंगल मोकाशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ भंडारे यांनी केले.